उन्हाळा अविष्कारी...
उन्हाळा अविष्कारी...
उन्हाळा म्हणजे निसर्गाचा अविष्कार भारी
त्याचे उष्ण व कोरडे हवामान अलगत अवतारी
शाळा कॉलेजला सुट्टी अन पोरां-पोरींची मजाच न्यारी
उन्हाळा सुरुवात झाडांना पालवी फुटतात सारी
रंगपंचमी सन उन्हाळ्यातच असतो शानदारी
कलिंगड फणस फळे खाण्याची बातच न्यारी
आंब्यांची तर उन्हाळ्यात काही कथाच भारी
वाळवीचा उन्हाळी पाऊस म्हणजे आहे चमत्कारी
उन्हाळा असतो खरंतर थोडा वक्रकारी
यावेळी आईसक्रीम खाण्याची बातच न्यारी
कुल्फी गोला लिहून तोंडाला पाणी येतंय वारंवारी
थंड थंड खाण्या-पिण्याची काही बातच मजेदारी
खरंतर उन्हाळा फक्त एक निम्मित आहे भालदरी
कुलर समोर जोपायसाठी यावेळी झगडा होतो मजेदारी
थोडं थोडं जास्त प्रेम थोडं अलगद अलवारी
उन्हाळा घेऊन येतो पूर्ण कुटुंबाला एकत्र घरी
सुट्ट्या असतात पोरांना म्हणुन मजा करतात सारी
जातात गावाला फिरायला थोडया घेऊन बॅग भारी
कुटुंब येत एकत्र आणि आनंद होतो कलाकारी
खरंच उन्हाळा असतो थोडा अद्भूत अविष्कारी.
