पिढीचा शोध...
पिढीचा शोध...
आजचे वैज्ञानिक लावताहेत नवा शोध सारी
त्यातही आजचे पोर म्हणजे कमाल भारी
देऊन आपल्या बुद्धीला कल्पनेची शिदोरी
बनवताय नवीन वस्तू जणू आहे अलंकारी
आजचे वैज्ञानिक आयुष्याला करताहेत सोपं सारी
त्यातही पोर त्यातून काढताहेत एक शॉर्टकट भारी
घेऊन मोबाईलची साथ थोडी अलगत अलवारी
नव नवीन विज्ञानिक घडताहेत घरीच धारदारी
पण त्यातही एक तोटा मात्र होतोय वारंवारी
आजच्या पोरात आळस भरलाय भरपुरी
घेऊन तंत्रज्ञानाची साथ थोडी अलवारी
पोर राहताहेत अवलंबुन या तंत्रज्ञानावर सारी
पण एक गोष्ट मात्र आहे साक्षीदारी
जग बदलतंय वेगात जणू आहे विणकरी
विज्ञानिक देतात या पिढीच्या हातात कमान सारी
आणि ही पिढी त्याचा उपयोग करताय भरपुरी
त्यामुळे आजच जग बनतंय साक्षात अविष्कारी
जवळ काही नसलं तरी आहे बुद्धी अलंकारी
त्याच्याच जोरावर आयुष्य बनतंय वक्रकारी
जणू एक बाश्या अन त्याची प्रजा शिरजोरी.
