STORYMIRROR

Gaurav Daware

Comedy Drama Fantasy

3  

Gaurav Daware

Comedy Drama Fantasy

लॉकडाऊनमधलं प्रेम

लॉकडाऊनमधलं प्रेम

1 min
221

आज मी केलीय एक कविता प्रेमावरी

तुटक मुटक असली तरी वाटेल ती खरी

पण ही आहे फक्त एक कल्पना शहारी

तथ्य नाही याच्यात किंचित थोडं तरी


ही माझी कविता आहे ओझरत्या प्रेमावरी

लॉकडाऊन मधलं प्रेम काही आहे थोडं भारी

मास घालून भेटतायत जोडपे इथे सारी

तर काही मात्र दुरूनच रामराम ठोकताय बरी


परीक्षा होतेय प्रत्येक जोडप्याची इथ प्रेमावरी 

प्रेम काय असत ते कळतंय दूर राहून थोडं भारी

आठवणीची मजा न्हाळतेय आता चोपदारी

स्वप्नात आठवूनच एकमेकांच सुखं मानताय सारी


काही जोडपे लपून करताय फोन अलवारी

तर काही मनात बोलताय तिच्याशी हळुवारी

काही दोष देताय स्वतःला जणू आहे कर्जदारी

तर काही फोटो पाहून मानताय तिला खरी


काही प्रियकर तिला आठवून बनताय चित्रकारी

तर काही चिंतेत स्वतः हटवातंय अनुस्वारी

काही प्रियकर पुन्हा प्रेम करताय तिच्या कलेवरी

तर काही भेट घेऊन बनताय स्वतः साक्षीदारी


पण प्रेम आहे साक्षात ते नाही चमत्कारी

परिस्थिती आहे विकट अन थोडी भारी

मास लावा राहा घरात ही स्वतःची जवाबदारी

प्रेम आहे खरं तर तिलाही ठेवा सुरक्षित तिच्या घरी.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy