तुझं माझं जमेना
तुझं माझं जमेना


कोरोनाच्या रुग्णात होऊ लागली दिवसेंदिवस भर
वाटायला लागले सुरक्षित फक्त आपले घर
सगळ्यांच्या असण्याने वाढली घरात गोडी
वेळ जाऊ लागला सोडविण्यात कोडी
रोज व्हायच्या खाण्याच्या नवनवीन फर्माईशी
अंथरूणाताच दिली जायची कपबशी
जपले साऱ्यांनी आपले छंद
असायचे जोडीला संगीत आवाजात मंद
दिव्यात लावताना सातला वात
विचारलं जायचं झाला का वरणभात
भांडी घासताना करावा लागतोय बऱ्याचदा फोम
कामाने वेळ मिळेना करायला कोम
नव्हतं तिच्यासाठी वर्क फ्रॉम होम
आयुष्यभर केलं तिने वर्क फॉर होम
दमायला लागले तिचे हात करून काम
लावावा लागायचा आता तिला थोडा बाम
पहिले थोडे दिवस वाटले सगळे कसे छान
पण आता वाढत चालला होता घरातील ताण
उडायला लागले आता दोघांत खटके
भासायला लागले पैशाच्या अडचणीचे चटके
घरातलं काम काही केल्या संपेना
तुझं माझं काही जमेना