विमानप्रवास
विमानप्रवास


चौदा अक्षरी
ऐलसीटावरी मामी, बसे सैलावूनी
निळसर पट्टा, घट्ट बांधला खोवूनी (1)
वाट तयांची, काय पुसता अभ्रांतूनी
ढगांवरी कुरघोडी, अंतराळातूनी (2)
शीतपेये सुंदरी, पुसती प्रश्नांतूनी
हो नाही येतसे, आशंकित मनातूनी (3)
सस्मित सुंदरी, खाऊ देतसे येऊनी
चट्टामट्टा करिती, मामी लाजलाजुनी (4)
डिश चुकुनी येतसे, सामिष भरुनी
त्वरे बोलाविती, मेटाकुटीस येऊनी (5)
जाय कवडसा, भास्कराचा सुखावूनी
निसर्गाला दाद देती, अंतर्मनातूनी (6)
वारंवार सांगती, शेजाऱ्या विनवूनी
हात नका ठेवू असा, हद्द ओलांडूनी (7)
खडखड लाडूंची, होतसे खणाणूनी
मामी गप्पगप्पचि, मनी भूक दाबूनी (8)
हास्याच्या लहरी, पसरती शेजारुनी
मामी बळेबळेच, हसती ओशाळूनी (9)
पोचता विमान, अमेरिकेस थांबूनी
हुश्श करी मामी, फोन त्वरे उचलूनी (10)