अनुभव गुरु जीवनी
अनुभव गुरु जीवनी


जीवनाच्या वाटेवर
कटू गोड आठवणी
ठेवा अनुभवांचाच
सदा लाभतो जीवनी
कधी नाते जवळचे
परि पाठ फिरविती
मना यातना असंख्य
सल अनंत बोचती
कधी नाते ना रक्ताचे
करी मदत नि सेवा
मन भरुन येतसे
वाटे भाग्याचा हेवा
कधी अनुभव भले
मन भरते आनंदे
देव भेटला वाटते
मन मोदे बहरते
दुःख अपेक्षाभंगाचे
तीर जातसे उरात
वार कृतघ्नपणाने
मन उडते क्षणात
अनुभव ठेवा लाभे
सुख दुःख चक्रातुनी
थोर शिकवण मिळे
अनुभव विश्वातुनी