STORYMIRROR

Shrinivas Yeilwad

Others

3  

Shrinivas Yeilwad

Others

डोळे नभाकडे

डोळे नभाकडे

1 min
28.1K


डोळे नभाकडे

रोखून जीव आहे,

मातीत कुटुंबाचा

झाकून जीव आहे..


रिणभार डोई घेऊन

बीज बीज पेरला मी,

दुष्काळ गरिबीचा

चाखून जीव आहे..


घास घास पाखरांचा

एक तुझ्या आशेवर,

थेंबा थेंबाच मोल

वाखून जीव आहे..


घे बरसून एकदाचा

असा अंत नको पाहू,

रानात फास फांदीस

टाकून जीव आहे..


साहित्याला गुण द्या
लॉग इन