रिमझिम पावसात
रिमझिम पावसात
रिमझिम पावसात आपण दोघे भिजायचो,
आठवतं का तुला?
आजपण तोच पाऊस आहे,
पण माझ्यासवे भिजण्यास तू नाहीस..
आजही तसाच गारवा शहारे आणतोय अंगावर,
मधेच इंद्रधनुची उधळण होतेय आकाशी रंगावर,
हा ऊन पावसाचा खेळ चालूच आहे,
पण त्यात मिसळण्यास तू नाहीस..
रात्र होत आहे चंद्र ढगांमधून डोकावतोय,
आपल्याला पाहण्यासाठीच तर नसेल,
गेल्यावेळी असाच पाहत होता तो दोघांना,
आज मात्र त्यास मी एकटाच दिसेल,
आजही तीच रात्र आहे
पण माझ्यासवे बसण्यास तू नाहीस..
किती वाट पाहायला लावणार आहेस अजून???