Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

prashant badgujar

Romance

3  

prashant badgujar

Romance

ओघळणारे अमृत

ओघळणारे अमृत

1 min
14.2K


ओघळणार अमृत नभातील

आज मी माझ्या नजरेतुनी प्यायलो

शिंपीत दुःखाच्या दाहक संवेदना

वाट माझी मी निर्मीत गेलो

दुःख कधी सांगता सांगता 

सुखालाही मी मुकलो

ओल्या वाळूत पाऊलवाटा शोधताना

सागरी लाटेलाच मी विसरलो

विरक्त जाहलेल्या मनाचाही

फार खोल गहिवर झाला होता

दुःखाने ह्रदयाचा प्रवाह मात्र

अशांतच झाला होता

तू नकोच हवी होती 

प्रतिबिंब माझे बोलले होते

सावलीला बघत तुझ्या

प्रतिबिंबच माझे मी विसरलो होतो

अर्थ शोधता शोधता 

तुझ्या 'नकाराचा' दुःखातच मग मी विलीन झालो

मग काय

ओघळणार अमृत नभातील 

नजरेतूनच प्यायलो 

नजरेतूनच प्यायलो.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance