STORYMIRROR

prashant badgujar

Romance

2  

prashant badgujar

Romance

क्षणात तू..

क्षणात तू..

1 min
2.6K


शिंपीत सडा आठवांचा

धुक्यानेही वाट निर्मीली आहे

तरंग उठवीत मनाच्या डोहात

क्षणात मजला तू कळली आहे

विरहाच्या क्षणी सुकल्या पानाच्या

पाचोळा होऊन निजताना

भेगाळलेल्या धरती नजीक

मजला तू कळली आहे 

 

पापण्यांच्या ओलाव्यात

आसवांनी विसावा घेताना

प्रत्येक हुंदक्यात 

मजला तू कळली आहे 

दवबिंदुंनी रचलेल्या रासेत

इंद्रधनु बघताना

प्रत्येक रंगात

मजला तू कळली आहे 

वा-याची प्रत्येक झुळूक

अंगावर शहारा आणणारा असताना

प्रत्येक रोमांचात

मजला तू कळली आहे 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance