निसर्ग
निसर्ग

1 min

11.7K
नादावली रात फेसाळली बात,
कनक टिपऱ्यांची चांदण्याला साथ
भणाणला वारा शिडीत भरारा,
सळसळ लाटेला लपवी किनारा
झाडातून फूल डोकावून पाही,
चैतन्याचा झरा पानातून वाही
तप्त वाळुवरी चांदण चुरा पडे,
शीतल चांदवा शिंपीत जाई सडे
लकाके वीज लेवून पैंजण,
चुनर ओढूनी तरारे गगन