Ajay Bagul

Fantasy


3.8  

Ajay Bagul

Fantasy


जिव्हाळा

जिव्हाळा

1 min 201 1 min 201

जीवनात नको ऋत फक्त

उन्हाळा, पावसाळा, हिवाळा

चौथा एक ऋतु असाही यावा

नाव असावे ज्याचे जिव्हाळा

        असेल ज्यात फक्त आपुलकी अन लळा

        नात्यांमधील प्रेमानेच भरेल

        मनाचा फळा

आपल्या माणसाच्या प्रगतीनेही

येणार नाही पोटात कळा

त्यालाच नाव देता येईल जिव्हाळा

        प्रत्येकाची पोटं मायेनंच भरतील

        अन आपल्या माणसासाठी माणसं

        मनापासून मरतील मग

        प्रत्येक जण एकमेकाला जीव लावेल

        तेव्हा प्रार्थना न करताही देव पावेल

मात्र इथे पैशामुळे माणूस आपलेपणाला

विसरत चालला

नीती आणि नाती सारं सोडून

घसरत चालला

        जो तो इथं आपल्याच मस्तीत

        ताट आहे , पण विसरतो आहे

        वय निघून गेल्यावर फक्त

        चार पायांची खाट आहे अन

        सर्वांसाठी जाण्याची एकच वाट आहे

म्हणूनच चौथ्या ऋुतुचीही

निर्मिती यावी फळाला

 नाव असावे ज्याचे जिव्हाळा

        आपल्या माणसाचे मनही ज्यात स्पष्ट दिसेल

        प्रेम, विश्वास, आपुलकीची त्यात कमतरता नसेल

उन्हाळा पावसाळा हिवाळा यांत तो फिट बसेल

प्रत्येकाने वाट पहावी असा हा ऋतू असेल

प्रत्येकाच्या जगण्यात मग फक्त आनंद दिसेल


Rate this content
Log in

More marathi poem from Ajay Bagul

Similar marathi poem from Fantasy