बाप
बाप


शब्द दोनच अक्षरी आहे बाप नावाचा
परिवार घडविणारा आहे सुंदर साचा
मुलांसाठी बाप असणारा त्यांच्या आईसाठी पती असतो
कुटुंबाच्या रथासाठी तोच गती असतो
बाप झाल्याच्या आनंदात त्याला
जबाबदारीचा विसर पडतो
मुलगा असो वा मुलगी तो काटकसर करतो
संसार सुखाचा करण्यासाठी रात्रंदिवस झटतो
मुलं मोठी झाल्यावर त्यांच्या संसाराची स्वप्न थाटतो
परिवार आणि संसारासाठी तो कधीच थकत नाही
दुःख कितीही असले तरी अश्रू ओकत नाही
मुलगा अन् पतीची भूमिका पार पाडून तो बाप बनतो
म्हणून पित्याचा रोल त्याला आपोआप जमतो
बाप से बेटा म्हणीप्रमाणे बेटा हुशार बनतो तेव्हा
मुलाच्या प्रगतीसाठी तो सहज नमतो
केवळ बाप होऊन जगणं त्याला जमत नाही
मुलीच्या कल्याण्याशिवाय त्याचं मन रमत नाही
मुलं मोठी झाल्यावर तो सारं आठवतो
पोटच्या गोळ्याला ही आनंदान सासरी पाठवतो
भीतीच्या प्रसंगी अंगी थरकाप होतो अन् पहिला शब्द
तोंडआत बापच येतो
परिवार सुखी आणि आनंदी करण्यासाठी त्याचं एक
बाहेर अन् एक घरात पाय असतो तरीसुद्धा बाप शब्दा आधी माय असतो
काहीही झालं तरी बाप तो बापच असतो
कुटुंबाच्या प्रगतीचे तोच खरे माप असतो