Ajay Bagul

Inspirational


3  

Ajay Bagul

Inspirational


जीवनगाणे

जीवनगाणे

1 min 193 1 min 193

जन्मा येता या तरूवर

मृत्यूही स्वीकारा आनंदाने !

कुणी न उलटती हया

आयुष्याची मिटली पाने

जगू सारे आनंदाने..

गाऊ या जीवनगाणे !!


सुख दुखः हे

आयुष्याचे खरे सोबती

का उगाच गाती रडगाणे !

येणे हाती नाही आपुल्या

नाही निघून जाणे

जगू सारे आनंदाने ..

गाऊ या जीवनगाणे !!


आयुष्यभर संचय केला

कष्ट करून जोमाने !

वेळ येता जाण्याची

जीव वाचविला का

या पैशाने ?

जगू सारे आनंदाने ..

गाऊ या जीवनगाणे !!


जन्मा येता मुठा वाळुनी

जातांनाही खालीच जाणे !

खोटा सारा पैसा अडका

अन् खोटे सारे नाणे

जगू सारे आनंदाने ..

गाऊ या जीवनगाणे !!


रूढी परंपरांचा आदर

करूनी पाळू या नित्यनेमाने !

निसर्गाचा समतोल साधण्या

पुढे येऊ या प्रत्येकाने

जगू सारे आनंदाने ..

गाऊ या जीवनगाणे !!


जीवनाचे तत्व मानवा

येईल केव्हा कळूनी !

क्षण निघून जाता सुखः

भोगण्याचे काय

उपयोग जीव जाळुनी

जगू सारे आनंदाने ..

गाऊ या जीवनगाणे !!


जन्म मिळतो एकदाच हा

आनंद भोगू या सुखाने !

आणले भूमीवर ज्या देवाने

आभार मानू त्याचे सदमुखाने

जगू सारे आनंदाने ..

गाऊ या जीवनगाणे !!


Rate this content
Log in

More marathi poem from Ajay Bagul

Similar marathi poem from Inspirational