STORYMIRROR

AnjalI Butley

Inspirational

4  

AnjalI Butley

Inspirational

भांडतो शाळेतल्या बाकांवरून

भांडतो शाळेतल्या बाकांवरून

1 min
482

पन्नाशीतही आम्ही मित्र भांडतो शाळेतल्या बाकांवरून


पन्नाशीतही आम्ही जपतोय मैत्री

शाळेतल्या नटखट आठवणींची श्रीमंती घेऊन!


कोण कोणत्या बाकावर बसायचे

अधिक दंगा मस्ती करत?

पुढचे, मधले की मागच्या बाकावरचे?


चला एकदा परत शाळेत जाऊन

उजळणी करूया त्याची!


करू लागले सर्वजण तयारी त्याची

करून एकमेका फोन!


फोनवरच गप्पा मारत बसले तासन् तास

हि काय करते... तो काय करतो याची विचारपुस करत!


शाळेत असताना एक मुलींच्या बाकांची ओळ 

तर त्याच्या शेजारी मुलांच्या बाकांची ओळ


वर्गात नेहमीच असायची 

मुला मुलीं मध्ये चढा ओढ!


रात्री झोप लागलीच नाही

सारखे कोण कोण भेटणार याचीच ओढ!


सकाळी लवकर उठुन

शाळेत जाण्या झालो सज्ज!


शाळेत पोहचले वेळेत सर्वजण

पटापट एकमेकांशी भेटून आनंदी झाले मन!


वर्गातले ते बाके

आवाज देत होते...


अरे लबाडांनो

आम्ही साक्षीला होतो तुमच्या शाळेतल्या दंगा मस्तीचे!


हसत खिदळत परत वर्गात शिरलो...

बाके होती आपल्या जागेवर!


मुल म्हणाली आता ढेरीमुळे

नाही बसता येणार बाकावर!


प्रयत्न केले

आणि कोंबले स्वताःला बसण्या बाकावर...


बाकानेही प्रेमाने घेतले

त्यांना आपल्या मांडीवर!


एकजण उठला मागच्या बाकावर जाऊन उभा राहीला

शाळेतल्या बाईंनी दिलेल्या शिक्षेची आठवण काढत!


मागे वळून बघताना 

हास्याचा गडगडात झाला वर्गात!


बाकावर उभ्या असलेला मुलाने

सेल्फी काढली आमच्या पन्नाशीत भरलेल्या वर्गाचे!!


बांकही हसले.आशीर्वाद दिला

खूप छान


अशीच जपा तुमची मैत्री

ठेऊन सामाजिक भान !!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational