Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Vrushali Khadye

Inspirational

5.0  

Vrushali Khadye

Inspirational

शाळा

शाळा

1 min
660



(चाल- छोटेसे बहिण भाऊ)


अभ्यासाचा लळा लावी

अशी आहे शाळा बाई

सुंदर जीवनाला,सुंदर मनाला

नवीन आकार देई

अशी आहे शाळा बाई...||धृ||


शिकवी नाना अक्षरं

करते मज साक्षर

वाचन,लेखन,व्यवहार ज्ञान

सा-याच गोष्टी शिकवी

अशी आहे शाळा बाई...||१||


नव्या नव्या मित्रांची भेट

मैत्रीचा धागा जुळे थेट

प्रेमळ शिक्षक,मुलांचे रक्षक

आनंद देई अन् घेई

अशी आहे शाळा बाई...||२||


प्रेमाने एकत्र शिकू

थोरांचा आदर राखू

उज्वल कीर्तीचे,पाईक राष्ट्राचे

शिल्पकार जणू घडवी

अशी आहे शाळा बाई...||३||


Rate this content
Log in