शेवटी
शेवटी
तुझं वागणं मनाला सलते शेवटी
जमले सरण जाळण्या भलते शेवटी
तुझं वागणं नजर चुकवून जाणं का
तू जीर्ण जखम का ओली करते शेवटी
आसवांना दोष नाही देणार मी आता
त्यांनीच सांगितले लेखणी मरते शेवटी
काय सांगू काळजाला दुःख झालेले
झाकण्या ते दुःख रात्र ढळते शेवटी
शांत राहून वेदना झाकल्या जरी कधी मी
भाव पाहून कवितेचे सारे कळते शेवटी
रीत नवी या जगाची सांगू कोणाला मी
जात माझी पाहून रीत नवी छळते शेवटी
प्रेमाची आपल्या गोष्ट अधुरी राहिली
जग सोडल्यावर हात तू मळते शेवटी
