STORYMIRROR

Neha Ranalkar(Nawate)

Inspirational

4  

Neha Ranalkar(Nawate)

Inspirational

वेदनेतही गरीब आनंदी

वेदनेतही गरीब आनंदी

1 min
245

बाळ घेऊन पाठीवर

वेदनेतही आनंदी ती

गरीबीचं गाठोडं उरी

बाळाशी हसून बोेले ती


तिच्या साठी सर्वस्वी फक्त

आहे तिचं आपलं ते बाळ

दु:ख सारं वेशीवर टांगून 

जोडू पाहे आनंदाशी नाळ


पायांत नाही चप्पल तिच्या

चालतेय काट्याकूट्यांतून

बाळाच्या बोबड्या बोलात

गेलीय देहभान विसरून


विसरून गरीबीची झळ

बाळासाठीच कष्ट करते

तान्हुल्या साठीच फक्त

तिच्यातील ममत्व उरते


गरीबीतही कष्टक-यांना

संतोषीवृत्ती होते आधार

मनाशी नवी उमेद घेऊन

करू पहाती स्वप्ने साकार


गरीब लोक वेदना सहन करूनच फक्त आजचा विचार करत अल्प संतुष्ट राहून आनंदी जीवन जगू पहातात.स्वप्न उराशी बाळगून आहे त्याही परिस्थितीत नव्या उमेदीने जीवन जगतात.छोट्या छोट्या गोष्टी त सुख शोधतात!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational