STORYMIRROR

Sonali Butley-bansal

Inspirational

4  

Sonali Butley-bansal

Inspirational

गरिबी

गरिबी

1 min
402

दरबदर भटकते मी,

 मला नसतो कोणताही ठावठिकाणा

 नाव माझे गरीबी !!!

कधी बांधकाम , मातीकाम ,

साफसफाई, मोलमजुरी, ऊसतोड ,

रोजच काम मागत फिरणे,

 भीक मागत रस्त्यावरच पथारी पसरणे

 अशा एक ना अनेक ठीकाणी अस्तित्व माझे...


तर कधी उच्चशिक्षितांत बेरोजगार,

 अर्धवेळ कामगार म्हणून,

 तर कधी काँट्रॅक्ट बेसिसवर छुपे अस्तित्व माझे

माझी रूपे अनेक !!!


दिसणारी आणी खरे तर न दिसणारीच जास्त कारण मला लपवण्यातच पुरुषार्थ मानणारे असंख्य...


जे मला सोबत घेऊन जगतात

त्यांच्या चेहर्‍यावर कायमच असते निरागस हास्य अन् आनंद,

खायला कोंडा आणी निजेला धोंडा हेच माझे ब्रीदवाक्य, 

 नसतो कुठलाही मुखवटा जगात आहे तसेच दाखवणारा खरा चेहरा

नसते काही गमावण्याची वेदना अन् दूःख

कारण अंगावरच्या वस्त्राइतकीच माझी श्रीमंती ...

अंगावरच्या वस्त्राइतकीच माझी श्रीमंती ...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational