STORYMIRROR

नासा ( NaSa ) येवतीकर

Inspirational

4  

नासा ( NaSa ) येवतीकर

Inspirational

जिव्हाळा

जिव्हाळा

1 min
651


हल्ली होतच नाही 

प्रेमाचे संवाद कुटुंबात

सगळेच व्यस्त आहेत 

आपाआपल्या कामात


एकत्र कुटुंबात होता 

प्रेम आणि जिव्हाळा

एकमेकांचा राहत असे

एकमेकांशी खूप लळा


आजी आजोबांचे पूर्वी

मिळत होते माया ममता

छान छान गाणे गोष्टी 

ऐकत असे झोपता झोपता


विभक्त होता कुटुंब 

संपला त्यांचा जिव्हाळा

आपल्याच कोशात 

त्यांचा जीव गुरफटला 


लेकरांना मिळेनाशी झालं 

घरातल्या वाडवडिलांचे प्रेम

आई-बाबांना मिळेना वेळ

मुलं व्यस्त खेळण्यात गेम


सत्ता संपत्ती धन दौलत हे

मिळविता येतात कधी ही

कुटुंबात संपलेला जिव्हाळा

उभ्या जन्मात मिळणार नाही



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational