STORYMIRROR

Prashant Kadam

Inspirational

4  

Prashant Kadam

Inspirational

ट्रायल !

ट्रायल !

1 min
371

ट्रायल रुम च्या दरवाजा बाहेर 

बिचारा नवरा होता ताटकळत

खांद्यावर लाईफस्टाईलची बैग

अन् मोबाईल वर होता खेळत 


आजुबाजुला बायकांचा गराडा

हा संकोचाने उभा होता बिचारा

मधे मोबाईल मधुन मान काढत

गप बघत होता बाहेरचा नजारा


मधेच दरवाजात यायची ललना

शू शू करत नव-याला शोधायची

अंगावर चढवलेला नवीन ड्रेस

मुरडत येवून दाखवून जायची 


वा किती छान, हा सैल, हा तंग

अशा अनेक कमेंट होता ऐकत

मोबाईल मध्ये खेळता खेळता

चोरुन बघत होता सगळी गम्मत


तेवढ्यात बायको आली दारावर

चढवून एक भन्नाट ड्रेस अंगावर

शू शू , अहो बघा तरी कशी दिसते

दोन शब्दांत नवरा आला भानावर


तिला बघुन त्याचे डोळे विस्फारले

नको, छी, छी त्याने मानेने दर्शवले

अहो असे काय करता नीट बघा तरी

तिने रागात त्याला जोरात फटकारले


त्या नंतरचा तिचा तो तिखट कटाक्ष 

बघताच त्याने हसू आणले गालावर

मस्त खूपच छान दिसतोय तूझ्या वर

म्हणत लक्ष केंद्रित केले मोबाईलवर


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational