STORYMIRROR

Sonali Butley-bansal

Inspirational

4  

Sonali Butley-bansal

Inspirational

बाक

बाक

1 min
504

कितीतरी वर्षांनी शाळेतल्या वर्गातल्या

पहील्या बेंचवर बसून मागे वळून पाहीले माझ्या त्या शेवटच्या बाकाकडे ,


तेव्हा तो दाखवू लागला ....

 खाकी दफ्तर दोन खणांचे एका खांद्यावर पेलणारे,

तेलाच्या डागांचा सजलेले,

पाटील पेन्सील स्पंजची डबी असलेले,

पुढे पुढे वह्या- पुस्तके ,कंपास पेटी, आणि बऱ्याच गोष्टींना सामावणारे ...


लाकडाचा उंच थोडासा, खडबडीत ,

शाईच्या डागांचा,

 कोरलेल्या नावांचा

किनार्‍यावर सोललेला

 अशाचसारख्या अनेक खुणा जपलेला बाक सांगू लागला शालेय जगताच्या हृदय आठवणी ...


बाकाच्या दफ्तराचा खण सांगू लागला

 लपून वाचलेल्या गोष्टी अन् कवीता

 मधल्या सुट्टीआधीच खाल्लेला न राहुन खाल्लेला डबा

गॅदरिंगच्या वेळी प्रॅक्टीस करताना धरलेला ठेका,

राग आल्यावर आपटलेल्या मुठी,

कमी गुण मिळाल्यावर हताशपणे टेकलेले डोके ,

अभ्यासाची केलेली आखणी,


बाकाच्याच साक्षीने जमलेली मैत्री ,

मैत्रिणींशी मारलेल्या गप्पा ,

शेअर केलेले रुसवे फुगवे ,

शिक्षकांची कौतुकाची थाप झेलत अभिमानाने घट्ट धरलेला याचा हात

हळू हळू सुटत गेला

ऊज्वल भविष्याची वाट दाखवत

हा मनात छवी कोरून गेला...



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational