भविष्यवेध
भविष्यवेध


ज्योतिषशास्त्र मानवासाठी आहे
सर्वात मोठं गुढ
प्रत्येक राशीनुसार बदलतो
माणसाचा मूड
सुर्य चंद्र ग्रह तारे आकाशात फिरतात
म्हणून मनुष्य सारे प्रकाशात हिरतात
मुहर्त पंचांग ग्रहशांती सा-यांच जीवनात
महत्वाचं स्थान आहे
ज्योतिषशास्त्राचं सारं यावरच बस्तान आहे
येणारा प्रत्येक क्षण हा एक
चांगला आणि वाईट असतो
परिणाम पाहिल्यानंतर त्याच्यावर
नावाचा शिक्का बसतो
विश्वास ठेवला तर सारं मोठं वाटतं
मानलं नाही तर फार खोटं वाटतं
येणा-या जाणा-याची प्रत्येकाची तिथी अन
पाहिली जाते इथे वेळ
जन्म आणि मृत्यूचा कुणाच्या
हाती नसतो खेळ
कारण येण्याचा अन जाण्याचा वेळी कुणालाच
गैरहजर राहता येत नाही
हाच एक क्षण स्वतःच्या डोळयांनी
पाहता येत नाही
प्रत्येकाच्या भविष्यात काही
तरी दडलेलं असतं
वेळेनुसार सारं काही उलगडत जातं मात्र
नशिबात असेल तेवढंच हाती येतं
सारं ज्योतिषशास्त्र अवलंबून आहे
खगोलशास्त्रावर
पण पृथ्वी मात्र चालते बोलक्या अस्त्रावर