तुझ्याशिवाय
तुझ्याशिवाय
सकाळी उमलणारी कळी
पहिल्यासारखी लाजत नाही
तुझ्याशिवाय..
रोज लागणारा सूर
पहिल्यासारखा लागत नाही
तुझ्याशिवाय..
तुझी वाट पाहणारे डोळेही
पहिल्यासारखी वाट पाहत नाही
तुझ्याशिवाय..
डोळ्यांतून वाहणारं प्रेम
पहिल्यासारखे वाहत नाही
तुझ्याशिवाय..
जगण्यात रोज येणारी मजा
पहिल्यासारखी येत नाही
तुझ्याशिवाय..
चैनीत राहणारं मनही
पहिल्यासारखं बेचैन राहतंय
तुझ्याशिवाय..
रोज धावणाऱ्या पावलांना
पहिल्यासारखी वाट सापडत नाही
तुझ्याशिवाय..
पावसांत भिजूनही
पहिल्यासारखं चिंब वाटत नाही
तुझ्याशिवाय..
गाभाऱ्यात दर्शन देणारा देवही
पहिल्यासारखं दर्शन देत नाही
तुझ्याशिवाय..
सारं काही बिघडलंय तुझ्याशिवाय
तू तरी कशी राहतेय माझ्याशिवाय
एकदा तरी येऊन हे सारं बघ ना!
पुन्हा एक आयुष्य माझ्यासोबत जग ना
मग तुही राहणार नाही माझ्याशिवाय..