डिजीटल दुनिया
डिजीटल दुनिया
तंत्रज्ञान बदलले अन जगण्याचा ,
चालीरितींचा मिडियाच बदलला
संस्कृती आणि संस्कारांवर
झाला मोठा हल्ला
काहीही शिकायला आज बाहेर
जाण्याची गरज नाही
सर्व गोष्टिंच्या निघाल्या आहेत सीडी
डोक्यात काही ठेवायची गरज नाही
कारण त्यासाठी आहेत पीडी
कृत्रिम मेमरीपुढे मानवी मेमरी लहान पडली
अन देवाने दिलेली मेमरी गरज नसतांना
गहाण पडली
आपला माणूस लांब असला तरी
क्षणात स्क्रीनवर बघून बोलू शकतो
सारं अतंर मिडीयाने सहज टाळू शकतो
अंगणातलं खेळणं अन त्यात हारणं जिंकणं
फस्त झालं
डिजीटल दुनियेत फिरणं खूपच
स्वस्त झालं
पृथ्वीच्या वातावरणात डिजीटलचं
साम्राज्य पसरत आहे
संस्कृती आणि संस्कार
आपले घसरत आहेत अन दुखः याचं
आहे कि मानव सारं विसरत आहे
आपलं माणूस जवळ असलं तरी
बोलायला वेळ नसतो
कारण प्रत्येकाच्या हातात
व्हॉटस्अपचा खेळ असतो
नमस्कारासाठी उठणारे हात अन
लाजेनं झुकणारे डोळे स्क्रीनवर भराभर फिरता
नको त्या गोष्टिंना सहजच हेरतात
सणासुदीला भेटण्यासाठी मन सैरवैर फिरते
वाढदिवस,दसरा अन दिवाळी सारं
व्हॉटस्अपवरच सरते
मग आपल्या माणसाला स्क्रीनवर
शोधणे एवढंच हाती उरते
आपल्या परिवाराचा ग्रुप सोडून
प्रत्येक जण दुसरा ग्रुप बनवतो मग
परिवारासोबत असूनही एकटाच जाणवतो
