STORYMIRROR

Sunita Ghule

Inspirational

4  

Sunita Ghule

Inspirational

आठवणीतला पाऊस

आठवणीतला पाऊस

1 min
263

गडगडणारे काळे ढग

घोंगावणारा उधाण वारा

आक्राळ तांडाव वीजांचे

पाठोपाठ टपटपती गारा।


आसमंती उठे धूळलोट

थेंब टपोरे भूईवर झेपावती

आठवणीतील पाऊस असा

रौद्ररुप निसर्ग कोपला भोवती।


निवाऱ्यास नसे काही

कुठे घ्यावा आसरा

पाखरांचा जीव सैरभैर

 कसा आवरावा पसारा।


नदीनाले झाले तुंडूब 

ठाव किनाऱ्यास लागत नाही

स्वप्नवत बरसणं पावसाचं

हल्ली असं घडत नाही।


डोळ्यात साठवलेले रूप हे 

आठवणीतच घालते पिंगा

पावसाळी गारवा सृष्टीत

अनुभवा येतो का आज सांगा??


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational