STORYMIRROR

नासा ( NaSa ) येवतीकर

Inspirational

4  

नासा ( NaSa ) येवतीकर

Inspirational

माझी शाळा

माझी शाळा

1 min
547

मला आवडते मनापासून

माझी बालपणीची शाळा

होते खूप सारे लंगोटी मित्र

आम्हांला एकमेकांचा लळा


शाळेला होती दारे खिडक्या

पण नव्हते बाक बसायला

चटई असलेली टाकलेली

बसायचो आम्ही शिकायला


शाळा होती घराजवळ

भीती कधी वाटली नाही

उशीर झाला म्हणून मला

छडी कधी भेटली नाही


मित्र होते छान छान

नेहमी अभ्यासात मग्न

दिलेले काम वेळेत पूर्ण

कधी आले नाही विघ्न


गुरुजी होते खूपच प्रेमळ

मन लावून शिकवायचे

गोंधळ केला किती तरी

कधीच नाही रागवायचे


शाळेतली शिकवण 

विसरले नाही कधी

ताठ मानेने वावरतो

जगतो समाजामधी



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational