जी हुजूरी
जी हुजूरी
सन्मानाने जीवनी कर्तव्य करी
त्याज्य लंपट वागणे 'जी हुजूरी'।
स्वार्थासाठी निर्बुध्दास खोटा मान
स्वबळाने लढण्यात खरी शान।
शिवबाच्या भक्ताचा झुंजार बाणा
अंगी बाणवावा लढवय्या राणा।
पाय चाटणे गुणधर्म श्वानाचा
त्याग 'जी हुजूरी' जन्म मानवाचा।
प्रीत खोटी;अपेक्षा जी हुजूरीची
तोड बंधना, शिक्षा ही मुजोरीची।
टाळण्याचे मोह सारे बळ मिळो
विनविते देवा संकल्प हा फळो।
