STORYMIRROR

Seema Gandhi

Inspirational

4  

Seema Gandhi

Inspirational

देश,क्रिकेट, चाहते...

देश,क्रिकेट, चाहते...

1 min
264

मॅच तर पाहिलीच पाहिजे.. 


मॅच तर पाहिलीच पाहिजे...

तिकडे सीमेवर जवान रोज शहीद झाले तरी आपल्याला त्याचं काय एवढं ?

टाकू या एखादी सुट्टी, लोळू या निवांत अन घेऊ या मॅचचा आनंद... 

 तिकडे त्यांनी रोज आपल्यावर हल्ले केले तरी आपल्याला त्याचं काय एवढं ?

रोज आपल्या जवानांवर दगडफेक केली, हिरवा झेंडा फडकवला तरी आपल्याला त्याच काय एवढं ?


आपण काय?! मित्रांना बोलवू, गप्पा रंगवू, रविवार मस्त मजेत घालवु...

किती आऊट झाले ? किती रन्स झाल्या ? विराट कसा खेळला ? धवन लवकर का आऊट झाला ?

हे आपल्यासाठी(चाहत्यांसाठी) महत्वाचे... आपली राष्ट्रभक्ती (की असेच काही बाही !) ठेऊ बाजुला गहाण....

 

नाहीतरी जवानांना कुठे असतात मने अन असतात घरी त्यांची वाट पाहणारे?

त्यांच्यासाठी असतो ना "फौजी भाईयोंके लिए", नाहीतर बटव्यात एखादा फॅमिली फोटो...


 असतं एखादं पत्र आईचं, नाहीतर बायकोच, "संदेसे आते है" टाईप...

अशी गाणी ऐकली की देशभक्तीचा जाम फिल येतो नाही ?!


BCCI ने तर क्रिकेटसाठी देशभक्तीशी तडजोड केली आणि आपण तर "सामान्य माणसं"...

आपण तर हे सर्व खपवुन घेउच अन आपल्या लाडक्या खेळाडूंना cheer-up करू...

TRP अन सट्ट्याच्या या खेळाला आपण नाही तर कोण डोक्यावर घेणार?!


काही झाले नाही हो असहिष्णूतेचे गुण गाऊन, अन पुरस्कार वापसी करून ...

आता आपणही निर्लज्जपणाची हद्द पार करू आणि मॅच मात्र काही झाले तरी पाहु !!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational