STORYMIRROR

Prashant Shinde

Inspirational

4  

Prashant Shinde

Inspirational

मंगळवार...!

मंगळवार...!

1 min
803

मंगळवार...सुप्रभात...!


मं गल विचार मनात आला

ग  म भ न कश्यासाठी...?

ळ चा अजून शब्द सापडत नाही

वा टत होतं मी फार हुशार...

र टाळ जीवन सालं


सु रवातीलाच नाक मुरडतंय...

प्र श्न घेऊनच जन्मा येतंय

भा न हरपतयं

त टस्थचं राहतो म्हणतंय...!


मी म्हंटलं जन्माला तर कशाला आलास..?

नुसता भुईला भार झालास...!

मला सांग लेका 

आजवर काय केलास...?


अंतर्मुख मी

स्तब्ध मी

क्षणात म्हंटलं जाऊ दे लेका

झालं गेलं गंगेला मिळालं...!

काय आश्चर्य

एक पाऊल

जोमानच पुढं पडलं...!


सुप्रभात...!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational