STORYMIRROR

गीता केदारे

Inspirational

4  

गीता केदारे

Inspirational

... शाळेतलं प्रेम...

... शाळेतलं प्रेम...

1 min
658

शाळेतल्या त्या बाकावर

कर्कटकने कोरलेलं तिचं नाव

 होता वसवला तेव्हाच ह्रदयात 

 आपल्या प्रेमाचा गाव...


सर्व मित्रांना होतं माहिती 

मी लपूनछपून तिला पाहत होतो

ती न येता शाळेत कधी

मनातल्या मनात मी झुरत होतो...


गृहपाठाच्या वह्या असायच्या अपूर्ण

अभ्यासात माझं लागत नसे मन 

ह्रदयी वसलेला तिचा चंद्रमुखी चेहरा 

तिला पाहिल्याविना जात नसे क्षण... 


शाळेतलं प्रेम ते मनातच राहिलं

तिचं लग्न मात्र दुसऱ्याबरोबरच वाजलं

प्रेमाचा उलगडा कधी करूच नाही शकलो 

अभ्यासाबरोबर तिच्या प्रेमाला ही मुकलो... 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational