अशाच एका सांजवेळी..
अशाच एका सांजवेळी..
अशाच एका सांजवेळी
मंद झुळुक ती आली
आली सहज अलगद ती
मोहित मला मात्र करून गेली
येऊनी हळूच दबकत ती
मुका गालावर देऊन जाई
केसांत फिरवी हात प्रेमाने
अंगी शहारे स्पर्शाने तिच्या येई
बघण्या तिचा पोरकट खेळ तो
मेघही दाटले होते अवकाशी
ती सांजच होती वेगळी
वेळही भान आपले हरवून बसली होती
तिच्या जाण्याने मन हे माझे
कावरे-बावरे होऊनी जाई
तिला न काळजी कशा कुणाची
अल्लडच ती, हाती कुणाच्या न येई
स्वप्ने सुंदर दावून मजला
ती लबाड प्रेमभंग करून गेली
तिच्याच गाण्यात गुंग ती
तिला न फिकीर जगाची काही
