शब्द
शब्द
शब्दचि जोडे शत्रुंस, शब्दचि तोडे मित्रांस
घराला घरपण देई तो शब्द
शब्दचि करी वाहवा, शब्दचि करी कधी अवमान
ऐकणाऱ्याचे मनही कधी जिंकून घेई शब्द
शब्द असे आरोळीत, शब्द असे कुजबूजण्यात
न बोलताही कधी व्यक्त होई शब्द
शब्द बने कधी राग, शब्द बने कधी प्रेम
कित्येकांच्या मनात काहूर मांडती शब्द
शब्द गीतकाराच्या गीतात, शब्द लेखकाच्या लिखाणात
वक्त्याच्या वक्तव्यास धार देई तो शब्द
शब्द ना याची, शब्द ना त्याची
निभावेल करार त्याचेच बनून जाती शब्द
