STORYMIRROR

Mangesh Cheke

Inspirational

5  

Mangesh Cheke

Inspirational

पंढरीची वारी

पंढरीची वारी

1 min
3.2K

हरिनामाचा हर्षाने जयघोष करीत 

टाळ मृदुंगाचा ताल गगनास भिडवित

विसरूनी भान जगाचे, त्याची गोडीच लय न्यारी 

पांडुरंगाच्या दर्शनास निघाली पंढरीची वारी

भक्तीत त्याच्या तल्लीन होऊनी

पाऊल एकेक पुढे टाकूनी

नाही उसंत आता थांबणे त्याच्याच दारी 

पांडुरंगाच्या दर्शनास निघाली पंढरीची वारी

एकमेका साह्य करीत 

अडथळ्यांवर सगळया मात करीत 

न कोण दूजा, त्याचा भक्त जो तो अमुचा सोबती 

पांडुरंगाच्या दर्शनास निघाली पंढरीची वारी

न कुणास मोठा अन छोटा मानूनी

भेदभाव सगळे मागे सारूनी

बाया माणसे लेकरे वयस्क एकत्र चाले सारी 

पांडुरंगाच्या दर्शनास निघाली पंढरीची वारी

पोटी घास नसे पण मुखी त्याचे नाव असे 

लक्ष वाटेवर पण चित्ती त्याचीच मूर्ती वसे 

रात्रंदिवस विठ्ठल नामात दंग सगळेच वारकरी 

पांडुरंगाच्या दर्शनास निघाली पंढरीची वारी

Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational