पहिला पाऊस
पहिला पाऊस
1 min
272
गडगड-गडगड करीत मेघ दाटीले नभी
हर्षून निघाले मग हे भोवताल सारे
खुदकन हसली धरणीही लागले मोर नाचू
आनंदाने धावती इकडून तिकडे वारे
टपटप-टपटप करीत मग आला पाऊस
ग्रीष्माचा शीण सारा उडोनी गेला
पाहुनी मोसमीचा पहिला पाऊस तो
पोशिंदा जगाचाही खूश बहोत झाला
बरसत-बरसत बरसती मग जलधारा
असे जणू देवाच्या डोळ्यातील असू
लहानथोर सगळ्यांच्याच मुखी
तो कनवाळू देवोनी जाई हसू
झटकन-पटकन झुकली पाने वृक्षांचीही
स्वागत त्या मान्सूनचे कराया
बघोनी पाणी नद्या नाल्या सुकलेल्या
लागली तहान आपली भागवाया
लगबग-लगबग थांबली व्यस्त पथाची
थोडा श्वास मोकळा तो लागला घेवू
थकलेला काळही थांबला इथे जरासा
या घटिकेचा मोह त्यास लागला अडवू
