परिवर्तन
परिवर्तन
1 min
206
निपचित हा सागर पडला असला आज जरी
त्सुनामीचं रूप उद्या तोही घेणार आहे!
अंधारलेला उभा आसमंत भासत असला आज जरी
असीमित प्रकाशात उद्या तोही डुंबणार आहे!
अस्तित्व नसलं त्या समीराला आज जरी
झंझावात घेऊन उद्या तोही येणार आहे!
अज्ञानाच्या दरीत कोसळला असला मनुष्य आज जरी
ज्ञानरुपी अवकाशात झेप उद्या तोही घेणार आहे!
