STORYMIRROR

Mangesh Cheke

Classics

3  

Mangesh Cheke

Classics

बदनाम तो क्षण..

बदनाम तो क्षण..

1 min
175

त्यास बदनामीचा लागलेला कलंक खोटा फार होता

आलेला तो शापित क्षणही किती जोरदार होता


मजला हरविण्यास आला तो बदनाम क्षण

तो आला हा तर केवढा वांछनीय उपकार होता


फसलो मी असा समज तयांनी करून घेतला

तो तर मी मलाच दिलेला सुखद फटकार होता


मुखवटा लुटला गेला निर्वस्त्र ही झालो पार

झालो बदनाम तो तर केवढा सत्कार होता


गडबडलो धडपडलो वळलो क्षणभर थांबून मी

एका वेगळ्याच विग्रहाचा तो तर ललकार होता


उपासना ती आमुचीच बदनाम मात्र तो क्षण झाला

जागविण्यास आलेला तो तर फक्त एक किरदार होता



Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics