STORYMIRROR

Girish Bhadwalkar

Others

4  

Girish Bhadwalkar

Others

मानवाचा प्रवास

मानवाचा प्रवास

1 min
568

सुरुवात झाली मानवाची अश्मयुगीन काळापासून ।

इतिहास शिकलो आम्ही सारे शाळेत एका जागी बसून ।।


  किती केली प्रगती याने लावले कित्तेक आज शोध ।

  विज्ञानात मिळतो आहे याचा वेळोवेळी बोध ।।


टीव्ही कॉम्पुटर मोबाइल निर्माण केली याने यंत्र ।

कल्पक बुद्धीच्या मानवाने आत्मसात केली अशी तंत्र ।।


  भूतलावरून अवकाशात घेतली मोठी भरारी ।

  अभ्यास केला ग्रहांचा अंतराळात करून सवारी ।।


वेळोवेळी मानव आज घेतो आहे उत्तम गती ।

दिसून येते मानवाच्या अश्या कार्यांची प्रगती ।।


Rate this content
Log in