STORYMIRROR

Sneha Rane

Others

2  

Sneha Rane

Others

माय

माय

1 min
2.7K


लहानपणी माझ्यासाठी कितीक

जागरणे करून

मला जागं केलस

निर्भय होऊन जगण्याचा

संदेश, तूच मला दिलास

नैराश्याचं वलय भेदायला शिकवून

जीवनाला माझ्या एक

वेगळाच अर्थ दिलास

जितका तुझा विचार करते

तितकी गुरफटत जाते मी

तुझ्या चेहऱ्यावरील

सुरकुत्यांच्या जाळ्यात

काय दिले मी तुला?

काय केले तुझ्यासाठी?

उत्तराचं भय वाटतं!

जितकी जगते, तितकी गे माय

देणेकरीण मी तुझी लागते

देणेकरीण मी तुझी लागते

 

 


Rate this content
Log in