मेघांचा ऋतु आला..
मेघांचा ऋतु आला..
1 min
14.1K
आला आला ,दारी सावळ्या,मेघांचा ऋतु आला..
स्वप्ने हिरवी, घेऊन सृष्टी, सज्ज स्वागताला....
दूर निनादे मयूराचा स्वर
कुठे कोकिळहि करतो जागर
एक चातकी आस लागली, काळ्या मातीला।।१।।
थेंब टपोरे येतील येतील
तप्त धरेला शांतही करतील
चमकत बिजली,तेज अंबरी,सजे मेघमाला।।२।।
आर्त मनांचे, सरेल आर्जव
निकट क्षणांना,येईल मार्दव
ओल्या ओल्या भवतालाची येत सृजनवेळा।।३।