पैसा म्हणजे सर्व काही नाही...
पैसा म्हणजे सर्व काही नाही...
पैसा म्हणजे सर्व काही नाही.... आज दुनिया सारी हपापलेली आहे,जो तो पैशांच्या मागे धावताना दिसतोय.. या पैशासाठी सारी दुनिया वेडी झाली आहे.. पैशासाठी माणूस वाटेल ते करायला तयार झाला आहे... पण हे तेवढेच खरे आहे की पैसा म्हणजे सर्व काही नाही... पैशामुळे बऱ्याच गोष्टी विकत घेता येतील,सोई सुविधा वाढतील पण खरं आत्मीक सुख समाधान जे आहे ते कधीच मिळू शकणार नाही... सोई सुविधा म्हणजे सुख नव्हे,टाटा, अंबानी,अदानी, बिर्ला सारे करोडपती, अब्जाधीशांचा विचार केला तर पैशावर लोळणारी माणसं मुळीच सुखी नाहीत.. पैसा पैसा करत सारं आयुष्य माणूस घालवतो..याच पैशासाठी त्याला आपलं, जवळचं, कोणतंच नातं कळत नाही... पैशांमुळे नी पैशासाठी आत्मीयता, जिव्हाळा, प्रेम, विश्वास,नाती, मैत्री सर्व संपून गेली.. कोणी कुणाला सुख दुःखात धावून जात नाही की मनापासून मदत करताना दिसत नाही.. आपुलकी, प्रेम, हरवलेलं आहे... पैशामुळे माणूस सोकावला, स्वार्थी बनला.. पैशांमुळे भ्रष्टाचार वाढला, बेइमानी, लबाडी, दुर्गुण वाढले, नितीमत्ता,मूल्ये हरपून गेले..कोण आपलं,कोण जवळचा,कोण दूरचा,कळणे कठीण झाले.. पैशांमुळे पैशासाठी जवळचे दूर नी दूरचे जवळ झाले.. जिथं पहावं तिथे व्यवहार नी औपचारिकता दिसून येते.. प्रत्येकजण आपलं आपणच पहातोय दुसऱ्या कोणाचा विचार करायला कुणाकडे च वेळ नाही..नाती संपून गेली.. रक्ताला रक्ताची ओळख राहिली नाही.. रात्रंदिवस कष्ट करणारा बिचारा, कष्टकरी,मजूर, शेतकरी राबराब राबून मिठ भाकरी,, कांदा मिरची, चटणी भाकरी मिळेल ते पोटभर खातो नी ऊन वारा पाऊस कशाची तमा न बाळगता सुखाची झोप घेतो... पैशे वाल्यांना काय खावं नी काय खावू नये ते कळनं कठीण झाले आहे..कारण खाल्लेलं पचत नाही... खायचं त्यांना मिळत नाही.. मिळतं त्यांना पचत नाही.. झोपेचा तर विषयच नाही.. शुगर,बिपी, हृदय विकार, गॅस ॲसिडिटी,मुळव्याध, निद्रानाश, गुडघे, कंबर,मान,डोळे, डोकेदुखी, कॅन्सर नको त्या बिचाऱ्यानी, पैसेवाले श्रीमंत, राजकारणी कितीतरी परेशान दिसतात.. सुख कशाला म्हणतात ते कोणत्याही लखपती, करोडपती, अब्जाधीशांना माहीत नाही... कारण सुख कधीच विकत मिळत नाही.. म्हणून पैसा म्हणजे सुख नव्हे.. पैसा म्हणजे सर्व काही नाही...गरीब, अनाथ, अपंग, लाचार, बेकार, यांना मदत करा.. नितीमत्ता, इमानदारी, माणुसकी, मूल्ये,नाती जपा, विश्वास संपा
