STORYMIRROR

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Abstract Action Inspirational

4  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Abstract Action Inspirational

मेल्यावर म्हणती...

मेल्यावर म्हणती...

1 min
28

 मेल्यावर म्हणती सारेच
 फारच चांगला होता,
जीवंतपणी तर त्याला
 कोणीच विचारत नव्हता...
 आजारी असताना नाही
पाहिलं कोणी त्याला,
नाही भरविला घास
 दवाखाना नाही केला...

 गरीबीत त्याला नाही
मदत कोणी केली,
दुःख आले नशीबी
लई वाईट वेळ आली...

 कोणी नाही कुणाचं
 हे त्याला कळलं व्हतं,
म्हणून त्याला मरणाचं
 वाईट वाटतं नव्हतं...

 दाखवती खोटी दुनिया
 उगीच खोटी किव,
वेळीच करुनी मदत
 वाचवा एखादा जीव...

 ही दुनिया सारी मतलबी
 कोणी कुणाचं नाही,
गरज सरो वैद्य मरो
 जान उपकाराची नाही...

 त्याच्या चांगल्या काळात
 सारे त्याचं गात होते,
 मागे पुढे सदा लोक
 रोज त्याचं खात होते...

 त्या लोकांमुळे गेला
 झाले शेवटी फार हाल,
खाऊन, गाऊन लोकांनी
 त्याला केलं होतं कंगाल..

 मरताना सारं कळलं
 लोक जवळ केंव्हा येतात,
 कोणी नसतं आपलं
 शेवटी धोका च ते देतात...

 हळहळ ती मेल्यावर
 म्हणती वाईट झालं,
तो वाचावा म्हणून
 नाही कोणी धावून आलं

 लई खोटी आहे दुनिया 
 खोटीच सारी नाती,
आपण म्हणतो आपले
आपले आपलेच धोका देती..
. नको कुणाचा भरोसा
 सारे करतात विश्वासघात
, लई वाईट हा स्वार्थ
 जपा  स्वार्थापलीकडलं नातं


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract