माझी सुंदर शाळा
माझी सुंदर शाळा
कौलारू छत भिंती
पाऊस येता माती
सुगंधित होई
शिक्षणा भोवती
छडी लागे छम छम
विद्या येई घमघम
खूप करायचा अभ्यास
गुरुजी मारती देती दम
खूप हुशार झालो
त्यांच्या आज्ञेत वाढलो
माझी सुंदर शाळा
स्वतः लढण्या शिकलो
आभार शाळेचे
दिवस आनंदाचे
उधाण अभ्यास
आणि खेळण्याचे
गुरुजनांनी खूप
मेहनतीने शिकवले
कोणी डॉक्टर वकील
कोणी माणूस बनले