रक्तचंदन
रक्तचंदन
कपाळी ज्ञानाचा सुवास
तिथंली शोभा रक्तचंदन
तिच कीर्ती त्रिभुवनी
त्यास करतो वंदन
कपाळा झिजून लागतो
आहे ज्ञानियांची शान
सुगंधीत गुणाने आहे
कपाळा टिळाचा मान
सुगंधीत रक्तचंदन
सुगंध देत अहोरात्र
लाल ललाट बनून
पसरवितो संत चरित्र
रक्तचंदन सारखे
बनावं कपाळाची शोभा
झीजून सर्वत्र पसरावं
सुगंधीत करावं नभा
सुगंध आणि शितलता
आहे रक्तचंदनाच्या ठायी
ज्यांच्या माथी शोभला
त्यांच्या पडावं पायी
