साखर झोप
साखर झोप


रोजच् तांबडे फुटते..
त्यात नवीन काय ??
माझ्या झोपेचं खोबरं होतं..
ते कोणालाच दिसत नाय..
उशीरा पर्यंत लोळण्याची आशा...
आजही घेतली पहाटेने हिरावुन...
एक दिवस तरी सुख अनुभवू दे रे देवा..
बघते म्हटल जरा अंथरुणात लोळून..
साखर झोपेला थोडीच ठाऊक असतं..
सकाळ केंव्हा झाली..
मस्त निद्रा देवीच्या अधीन होऊन
तिने पहाटच धुडकावून लावली
मस्त पैकी आळसावलेली...
एक सकाळ मनसोक्त जगावी...
अशी च सकाळ आयुष्यात..
रोजच पुन्हा पुन्हा देवाला मागावी