शब्द
शब्द
शब्द माझा प्राण, शब्द माझा जीव...
गंधाने तयांच्या, भावना होतात सजीव...
यास छंद म्हणु की व्यसन काही कळेना...
त्यांच्या विना चैन मनाला मिळेना....
शब्दाशब्दांत गुंतल, माझं अव्यक्त मन...
हया शब्दांसाठी करु शकते मी काही पण
शब्दांनाच समजते, माझ्या मनाची व्यथा
न सांगता ही उलगडतात शब्दातून कथा
घटकाभर त्यांच्याच सावलीत जीव विसावतो
खचलेल्या मनाला नव्यानं उभारी देतो
शब्दच माझे खरे सगे सोबती...
शब्दच जिवाभावाचे सांगाती...
सवय नसून "प्रीत" जडली शब्दांवर...
त्यांच्याच संगतीत प्रेम झाले जगण्यावर
मनाच्या धाग्यात शब्द फुले माळून...
अलवार बसते त्यांना कुरवाळून..
अशी अनोखी माझी शब्द प्रीत...
आनंदाने गाते मी आता जीवन गीत....
