"क्षितिज "
"क्षितिज "
क्षण क्षण आनंदाने
गेले सारे भरून..
जीव होई वेडा पिसा..
स्वप्न ती स्मरून...
क्षण तो एक सुखाचा..
कातर होऊन गेला...
रित्या माझ्या ओंजळीत..
भरभरून देऊन गेला....
शंख शिंपले ते..
सुखद आठवणींचे..
मरगळ दूर होई..
खेळ ते पाठशिवणीचे..
दुर वर कोणीतरी...
साद मज देई...
दिवास्वप्न ते जणु..
भाव विभोर होई....
कसले हे सारे..
भास न कळे..
जिथं नभास आभाळ..
हळुच मिळे..
रंगी बेरंगी छटांनी...
क्षितीज ते सजलेले...
सप्त रंगात न्हाऊन..
इंद्रधनु विराजलेले...
