"प्रीत "
"प्रीत "
सोडुनी अवघी ..
जुनी जग रीत...
भेटण्या आली..
बेधुंद ती प्रीत ...
सुखद गारवा...
मिळे मनास..
दृष्ट न लागो..
आता जीवनास...
कित्येक दिवसांनी..
दिलखुलास हसली आज..
ठेंगणे वाटे आभाळ..
घुमता कानी सागरी गाज...
रूप गोजिरे ते..
समाधानी क्षणांचे...
साजिरे सोहळे...
हळव्या भावनांचे....
मृदु, मुलायम...
क्षण हे कोमल..
हृदयात पेटलेला..
अखेर विझला विरहाचा अनल...
गहिऱ्या नात्याची...
वीण नव्याने घट्ट रुजवते...
रूजुवात करून मनी
स्वप्न नयनी सजवते ..

