भावना
भावना
अदृश्यच भावना, नयनी पाणी आणतात..
मलाही मन आहे,हेच क्षणो क्षणी म्हणतात
कातर,हळवे मन भावनांतून ओथंबते..
पापणीवर स्थिर होऊन अलगद विसावते..
घडे आसवांचे रिते करत जाई..
पुन्हा पुन्हा आठवणींच्या गर्तेत नेई..
मन अदृश्य, पण भावना मात्र खऱ्या..
चुक बरोबरच्या भानगडीत न पडता बऱ्या
मनाचं आभाळ आठवणींनी दाटलेलं..
भावनांच तर आभाळ फाटलेलं...
कुणाच्या हातात नसतं, भावनांना थांबवणं
सुरूच असते त्याचं आठवणींत गुंतवणं
मनाच्या तळाशी आठवणींचा सागर...
तरीहि माझ्या मनाची रितीच घागर...
बंद मुठीत वेळेला थांबवण्याचा प्रयत्न..
कसोशीने करते मी तो जगण्याचा यत्न...
काळाला मात्र वेळेचं बंधन...
चोवीस तास त्याचं अचुक नियोजन...
संकेत जगण्याचे जरा उशीराच कळाले.
साऱ्या प्रश्नांची उत्तरं खूप वेळाने मिळाले...
