मृगजळ
मृगजळ
आठवांची गर्दी अविरत नयनी दाटते...
डोळ्यातील पावसाला ती पापणीत दडवते
सर ती आठवणींची चिंब भिजवून जाते..
उसवलेल्या नात्यांचा मज हिशेब मागते..
राहिला जो श्र्वास थोडा व्याज त्याचे सांगते
अश्रु ही डोळ्यातील हिरावून नेऊ पाहते
लपविलेल्या भावनांची वादळे अविरत झेलीते
जीवन थोडे आता तरी मुक्त जगू पाहते...
घेऊ का मोकळा श्वास हेच मला विचारते
मिटून डोळे वाऱ्याला बाहूपाशात घेते
हात फैलावून दूरवर क्षितीज ते मज खुणवते
मृगजळामागे धावू नकोस हेच मला सुचविते
अधीर होऊन मन इंद्रधनुकडे झेपावते..
सप्तरंगी जीवन प्रवाहात वाहण्या तत्पर होते
